INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लोकनेता विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन !

लोकनेता विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन !

 

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर दर्शनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकनेता’ या विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नेते समर्थकांसह तालुक्याबरोबरच नगर,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते,नागरिकांनी या विशेषांकाचे जोरदार स्वागत केले.
सर्वसामान्य कुटूंबातून पुढे आलेल्या आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर अल्पावधीत मोठे लौकिक मिळविले.कोरोना काळात केलेल्या कामामुळे तर त्यांच्या नावाचा डंका केवळ राज्यातच नाही तर देशभरात वाजत आहे.सर्वसामान्यांच्या गळयातील ताईत बनलेल्या या लाडक्या लोकनेत्याच्या वाढदिवसाची कार्यकर्त्यांना काही महिने आधीच आतुरता लागून असते. हेच औचित्य साधून आ. लंके यांचा जीवनपट उलगडणारा ‘लोकनेता’ हा विशेषांक प्रकाशित करण्याचे योजिले होते.
‘पारनेर दर्शन’ च्या माध्यमातून पत्रकार विजय वाघमारे व पत्रकार देविदास आबूज यांनी सुमारे महिनाभरापासून या विशेषांकाची तयारी सुरू केली होती. अनेक सिद्धहस्त लेखकांचाही या कामी सहकार्य लाभले. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा संपादकीय मंडळाचा मानस होता आणि यातूनच ग्लेझ पेपरवरील तब्बल साठ पानांच्या दर्जेदार अंकाची निर्मिती झाली. वर्तमानपत्राच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला. या क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी या विशेषांकाचे कौतुक केले.
‘लोकनेता’ विशेषांकाच्या निर्मितीचे काम सुरू झाल्यापासूनच या अंकाची सर्वांनाच उत्सुकता लागून होती. माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते हंगा येथे दिमाखदार सोहळयात ‘लोकनेता’चे प्रकाशन करण्यात आले. खा.पवार यांनीही हा अंक न्हाळुन पाहिला.संपुर्ण मतदारसंघाबरोबरच कार्यक्रम स्थळी वितरण करण्यात आले. यावेळी सर्वांनीच या विशेषांकाचे कौतुक केले.तालुकाभरही सर्वत्र उत्सफुर्त स्वागत तर झालेच पण दर्जेदार विशेषांकाची जोरदार चर्चाही रंगली.


from https://ift.tt/og4U5rD

0 Comments:

Responsive

Ads

Here