नगर : भोरवाडीमध्ये गेल्या १५ वर्षात दिला गेला नाही, एवढा विकास निधी आता दिला आहे.यापुढेही दिला जाईल.तालुक्यातील प्रत्येक गावात दिला जाईल.फक्त बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमच्या विचारांची माणसे निवडुन द्या असे सांगताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समिती मध्ये राष्ट्रवादी ताकतीने लढणार असल्याचे संकेत दिले.
भोरवाडी (ता.नगर) येथे भोरवाडी ते अस्तगाव रस्ता 75 लाख, अकोळनेर ते मेहेत्रे मळा भोरवाडी रस्ता 75 लाख, भोरवाडी वाणी मळा बंधारा 65 लाख, बानूबाई मंदिर सभामंडप 10 लाख
अशा 2 कोटी 25 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर,उपसरपंच सुरेश जासूद, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, दीपक भोर, रंगनाथ जासूद, बाबासाहेब वाघ,बाबासाहेब भोर, सरपंच तुकाराम कातोरे, अजय लामखडे, नवनाथ म्हस्के, संग्राम गायकवाड, भगवान भोर, माजी सरपंच गणेश साठे ,अरुण गोंडाळ, दादा चौघुले, महेंद्र शिंदे, ह.बु,शिंदे,विद्या , संदीप वाघ, देवराम माने, अरुण भोर, जयसिंग भोर,प्रवीण जासूद,सचिन जासूद, नितीन शेठ भोर, आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लंके म्हणाले की ,विकास निधी देताना मी भेदभाव करत नाही.येथील स्थानिक विरोधक म्हणतात आमदारांनी दीड वर्षात एक पैसाही दिला नाही.आता 2 कोटींची विकास कामे दिली आहेत ,यापुढेही देणार आहे.मागील १५ वर्षात किती निधी दिला आणि मी दीड वर्षात किती निधी दिला याचा तुम्हीच हिशोब करा.यापुढेही देणार आहेच.असाच निधी तालुक्यातील प्रत्येक गावात दिला जाईल.माझे हात बळकट करायचे असतील तर माझ्या विचारांची माणसे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समिती निवडणुकीत निवडुन द्या असे सांगताना पुढील निवडणूक लक्ष घालणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
from https://ift.tt/pc32U75
0 Comments: