रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थाचे आरबीआय प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या संपूर्ण वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. त्यानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी, कोणत्या झोनमधील बँका बंद असतील? याबाबत जाणून घेऊयात.
दरम्यान बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर ते प्राधान्याने करून घ्या. कारण मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध झोनमध्ये एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल.
● मंगळवार – 1 मार्च : महाशिवरात्री (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
● गुरुवार – 3 मार्च : लोसार (गंगटोक – बँकांचे कामकाज बंद)
● शुक्रवार – 4 मार्च : चपचार कुट (आयजोल – बँकांना सुट्टी)
● रविवार – 6 मार्च : साप्ताहिक सुट्टी
● शनिवार – 12 मार्च : महीन्याचा दुसरा शनिवार
● रविवार – 13 मार्च : साप्ताहिक सुट्टी
● गुरुवार – 17 मार्च : होळी निमित्त देहरादून, कानपूर, लखनौ आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल.
● शुक्रवार – 18 मार्च : होली /Dhuleti/ डोल जत्रा (बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर सर्व झोनमध्ये बँका बंद)
● शनिवार – 19 मार्च : होली/ओसांगचा दुसरा दिवस (भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँकांना सार्वजनिक सुट्टी)
● रविवार – 20 मार्च : साप्ताहिक सुट्टी
● मंगलवार – 22 मार्च : बिहार दिवस (पाटणा झोन – बँका बंद)
● शनिवार – 26 मार्च : महीन्याचा चौथा शनिवार
● रविवार – 27 मार्च : साप्ताहिक सुट्टी
from https://ift.tt/uvFRbn2
0 Comments: