बारामती :पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे ५२५ कोटींचे वीजबिल थकले असून यामध्ये ३१८ कोटी मूळ थकबाकी व २०७ कोटी रुपयांचे व्याज आहे. या व्याजाला सवलत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. परंतु ब्रम्हदेव आला तरी ही विजबिले माफ केली जाणार नाहीत. बिले भरावीच लागतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले होते. यावर त्यांनी हे विधान करत वीज बिल भरावेच लागेल असे स्पष्ट केले.
शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता. मोठ्या विरोधानंतर मार्च महिन्यांपर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला.
शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता. मात्र मोठ्या विरोधानंतर मार्च महिन्यात वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. त्यामुळे वीजबिल माफी बाबत सरकार पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अजि तपवार यांनी वीजबिल भरावेच लागेल असे स्पष्ट केल्याने थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये नाराजी पसरली आहे.
from https://ift.tt/rxGjf5E
0 Comments: