पारनेर : विधानसभा निवडणुकीत वासुंदे ग्रामस्थांनी मला भरभरून मते दिली असून या मतांची उतराई म्हणून वासुंदे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.तर दुसरीकडे गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव महत्त्वाचे असतात त्यामुळे गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्या साठी ग्रामपंचायतने किमान ठराव देण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखविला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना टोला लगावला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वासुंदे ते वडगाव सावताळ या दोन किलोमीटर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आमदार निलेश लंके यांनी दिला असून त्याचे भूमिपूजन काल (मंगळवारी) करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते भागुजी दादा झावरे, राजेंद्र चौधरी,राजेंद्र चेडे ,जितेश सरडे ,बाळासाहेब खिलारी, दत्तात्रय निवडुंगे,पो.द.साळुंके, खंडु टोपले, आबासाहेब झावरे,बबनराव गांगड, रामा तराळ ,कारभारी पोटघन मेजर, अमोल उगले ,इंजिनीयर संजय साळुंखे,डॉ. उदय बर्वे, डॉ. बाबासाहेब गांगड, रवींद्र झावरे गीताराम जगदाळे, राहुल गायके जयेश झावरे, राजु रोकडे, सरपंच आप्पासाहेब शिंदे, पैलवान सतीश साळुंखे ,पैलवान अनिल हिंगडे ,पैलवान गणेश शिरतार दादा भालके, दत्तात्रय साळुंके, शांताराम साठे, मनोहर झावरे, रावसाहेब बर्वे, अंकुश साळुंके, बाळासाहेब साळुंके, भाऊसाहेब हिंगडे,ठेकेदार प्रदीप वारुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, वासुंदे ते खडकवाडी या रस्त्यासाठी जवळपास ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. तर दुसरीकडे वासुंदा गावासाठी जवळपास १ कोटी रुपयाचा निधी एका वर्षात दिला असून भविष्यातही जास्तीत जास्त विकास कामांसाठी झुकते माप देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे विकास कामांच्या निधीच्या बाबतीत वासुंदेकरांनी चिंता करू नये असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील ग्रामदैवत श्री भाऊसाहेब महाराजांच्या सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले असून या संपूर्ण कामासाठी जवळपास १ कोटी रुपयांच्यावर निधीची आवश्यकता आहे.त्यामुळे वासुंदे गावातील विकास कामांसाठी निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी दिले,असून या भाऊसाहेब महाराजांच्या विसावा मंडपासाठी ५१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा निकाली कुस्त्यांचे आखाड्यात केली आहे. आमदार लंके यांनी या सभामंडपाच्या साठी निधीची घोषणा करताच वासुंदे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून दाद दिली आहे.
from https://ift.tt/n1VIDfE
0 Comments: