उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. विशेषतः आजच्या दिवशी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्यांची एक शिवप्रेमी, शिवभक्त म्हणून आपल्याला माहिती असायलाच हवी…
19 फेब्रुवारी 1630 (तारखेप्रमाणे) रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यांचे नाव शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, पंथांचे, जातीचे मावळे होते. जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना त्यांनी सामावून घेतले घेते.
आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे, असे शिवाजी महाराज नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत.
त्यांनी गनिमी काव्याचा वापर चाणाक्ष पद्धतीने केला. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांचा योग्य पद्धतीने वापर करत शिवरायांनी बलाढ्य शत्रूलाही गनिमी काव्याच्या माध्यमातून धूळ चारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. ज्याचं आरमार, त्याचा समुद्र, असे धोरण शिवाजी महाराजांनी राबवले.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही लढाया करून जिंकले.
त्यांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्य साधारण होते. या अष्टप्रधान मंडळात 8 मंत्री होते. 30 विभागांत त्यांचे काम विभागलेले होते. या कामाच्या व्यवस्थापनासाठी ६०० कर्मचारी नेमण्यात आले होते.
त्यांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती.
from https://ift.tt/gpRhYB5
0 Comments: