INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

…म्हणून ट्रॅक्टरच्या पुढची चाके लहान आणि मागची मोठी असतात! 

…म्हणून ट्रॅक्टरच्या पुढची चाके लहान आणि मागची मोठी असतात! 

आपल्या देशात जवळपास 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सध्या शेतीचं आधुनिकरण झाल्याने शेतीत ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र तुम्ही कधी ट्रॅक्टरचा विचार केलाय का? ट्रॅक्टरचे पुढचे चाक हे लहान आणि मागचे चाक हे मोठे का असतात? चला, तर आज याबाबत अधिक जाणून घेऊयात… 
ट्रॅक्टरमधील मागच्या आणि पुढच्या चाकांचे उद्देश वेग-वेगळे आहेत. ट्रॅक्टरचे हँडलिंग, ग्रीप, बॅलन्स, तेल यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करून ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आलीय. ट्रॅक्टरच्या पुढच्या लहान चाकामुळे त्याची दिशा ठरते. कारण ही चाके थेट स्टेअरिंगशी संबंधित आहेत. स्टेअरिंग फिरण्यावरच ती चाके फिरतात.
मोडवर स्पेस कमी असल्यामुळे ते फिरवू शकता. यामुळे ट्रॅक्टरवर समोर जागेची गरज लागत नाही. तसेच लहान चाक असल्यामुळे इंजिनवर वजन कमी पडत असल्याने इंधन देखील कमी लागतं. ट्रॅक्टर कोणत्याही कार किंवा बाईकच्या तुलनेत अधिक चिखलातही सर्वोत्तम काम करतो. ट्रॅक्टरच्या मागचे टायर मोठे असल्यामुळे ट्रॅक्टर चिखलातून सहज बाहेर येतात.
ट्रॅक्टरमध्ये मागचे मोठे चाक असल्यामुळे ते कधीच चिखलात अडकत नाही. तसेच ट्रॅक्टरचे इंजिन पुढे असते. त्यामुळे वजनाचा समतोल सांभाळण्यासाठी मागे मोठ्या चाकांची गरज असते. तसेच वजन उचलताना किंवा फिरताना ट्रॅक्टर पुढून कधीच वर उचलत नाही. या सर्व कारणांमुळे ट्रॅक्टरच्या पुढची चाके लहान आणि मागची मोठी असतात.


from https://ift.tt/UKbo1D7

0 Comments:

Responsive

Ads

Here