मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेच्यावतीने 46 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास उल्लेखनीय दिवाळी अंक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे व प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. शनिवार दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वा. दादर सार्वजनिक वाचनालय, धुरु हॉल, पहिला मजला, दादा पश्चिम, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सन्मापुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
1949 पासून वृत्तपत्र लेखन सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असणारी मराठी वृत्तपत्र लेखक संघ सुपरिचित आहे. 1976 पासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्यावतीने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या 46 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत राज्यभरातील नामवंत व उल्लेखनिय दिवाळी अंकांचा पारितोषिकासाठी समावेश करण्यात आला आहे. यात निशांत दिवाळी अंकाची निवड झाली आहे.
‘निशांत’ दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांना नुकताच 6 जानेवारी 2022 रोजी प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल माजी मंत्री प्रा.राम शिंदे, अण्णासाहेब डांगे, महादेव जानकर, , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.
from https://ift.tt/3laS7d0
0 Comments: