दीपक करंजुले
सुपा : निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना जनतेचा पुळका आल्याची टीका आमदार निलेश लंके यांनी भोयरे गांगर्डे येथे केली.पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील महादेव मंदिर कलशारोहण व सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, हे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर वाळवण्याचे सरपंच सचिन पठारे, रुईछत्रपतीच्या सरपंच विजया साबळे, बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड, वाघुंडेचे माजी सरपंच संदीप मगर, बाळासाहेब खिलारी, उद्योजक बंडूशेठ साबळे, सतीश भालेकर,सचिन साठे, सरपंच अनिता भोगाडे, उपसरपंच सुधीर पवार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, आप्पासाहेब रसाळ, दौलत गांगड, माणिक पवार, नाना रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा निवडणुका जवळ आल्या की विरोधी मंडळी लग्न कार्य, दशक्रिया विधी, अंत्यविधीला बाहेर दिसू लागली आहेत यावरून त्यांचा जनतेपोटी असलेला ढोंगीपणा दिसून येतो. मी अडीच वर्षात १ कोटी १५ लाख ५० हजार रुपये विविध विकासकामांसाठी दिले.तर गेली १५ वर्षात किती निधी मिळाला याचे जनतेने अवलोकन करावे.
सारोळा सोमवंशी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे व इतर काही मागण्या आप्पासाहेब रसाळ ,माणिक पवार,सरपंच भाऊसाहेब भोगाडे,दौलत गांगड यांनी प्रास्ताविकात केल्या. यावर लंके यांनी पुढील दोन वर्षांत हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन उपस्थितानां दिले.विक्रमसिंह कळमकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्या थोर देणगीदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गावठाण व विठ्ठलवाडी अंगणवाडी साठी वॉटर फिल्टर चे वाटप करण्यात आले तसेच दिव्यांगांना चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी परीसरातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना रसाळ यांनी केले, प्रास्ताविक आप्पासाहेब रसाळ यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे यांनी मानले.
from https://ift.tt/aVWdupG
0 Comments: