पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथील श्री.गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासद व ग्राहकांना सध्याच्या डिजीटल युगात अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे यांनी दिली.
याप्रसंगी तात्काळ बँकिंग च्या माध्यमातून क्यू आर कोड व यूपीआय अॅपचा शुभारंभ गोकॅशलेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉ.कृष्णत चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे स्वतःचे यूपीआय अॅप उपलब्ध झाल्याने फक्त मोबाईल नंबरवरून पैसे पाठवणे किंवा मोबाईल नंबरवरून पैसे मागविणे सहज शक्य होणार आहे,त्याचा तात्काळ एस.एम.एस. ग्राहकांना जाणार आहे.त्यामुळे या सेवेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यवसायिकांना मोठया प्रमाणात होणार असून ग्राहकांचे आर्थिक व्यवहार जलद आणि सुलभ होण्यास मदत होईल.
तात्काळ बँकिंगचे क्यू.आर कोड व यूपीआय अॅप सुविधा वापरण्यास अतिशय सोपी अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे प्रतिपादन तात्काळ बँकिंगचे संस्थापक चेअरमन डॉ.कृष्णत चन्ने यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मंडळ,सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
from https://ift.tt/p0KVf8Z
0 Comments: