सध्या अमेरिकेतली एक महिला आणि तिचा बॉयफ्रेंड सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चमागे महिलेची उंची आणि तिचं प्रोफेशन कारणीभूत आहेत. या महिलेचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा तब्बल 13 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या कपलला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय.
ही महिला आहे 32वर्षांची सॅसी केसी. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव ब्लेक असे आहे. सॅसीची उंची 2 फूट 10 इंच आहे तर तिच्या बॉयफ्रेंडची उंची 5 फूट 7 इंच आहे. सध्या सॅसी एका बारमध्ये नोकरी करते. आपल्या नात्याविषयी सॅसी म्हणते, की ‘माझं ब्लेकवर जीवापाड प्रेम आहे. तो माझी काळजी घेतो. गेल्या वर्षी फेसबुकवर आमची ओळख झाली. एक महिना डेटिंग केल्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि आम्हीएकत्र राहत आहोत.’
एका वृत्तानुसार, सॅसी लहान असताना, डॉक्टरांनी तिला Cartilage-Hair Hyperplasia हा आजार असल्याचं सांगितलं. या आजारात हाडांची लांबी वाढत नसल्याने माणसाची उंचीदेखील वाढत नाही. त्यामुळे सॅसीची उंची सामान्य व्यक्तीच्या खूपच कमी आहे. मात्र तिनं कधीच या आजाराला आपली कमजोरी बनू दिली नाही.
या कपलनं म्हटलंय की, आमच्या नात्यावरून लोक आम्हाला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. मात्र दोघंही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लवकरच ब्लेक सॅसीशी लग्न करू इच्छित आहे. सॅसी म्हणाला, मला तिच्या कमी उंचीची, माझ्या वयाची आणि तिच्या नोकरीची पर्वा नाही.
from https://ift.tt/te9KG3b
0 Comments: