मेष : दानाचे महत्व पटवून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल.
वृषभ : तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात.
मिथुन : उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात.
कर्क : जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे.
सिंह : र्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे.
कन्या : रेस, जुगार यातून लाभ संभवतो. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.
तूळ : मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे.
वृश्चिक : उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शाब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
धनू : विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका.
मकर : जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. लोकनिंदेला बळी पडू नका.
कुंभ : बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. कसलाही वाद वाढू देवू नका.
मीन : वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा.
from https://ift.tt/L36Oqan
0 Comments: