INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

साहेबराव ठाणगे यांच्या दोन पुस्तकांचे उद्या प्रकाशन !

साहेबराव ठाणगे यांच्या दोन पुस्तकांचे उद्या प्रकाशन !

पारनेर : कवी,लेखक साहेबराव ठाणगे यांच्या ‘पांढरे कावळे’ व ‘सोयरे सकळ’ या दोन पुस्तकांचे संत साहित्याचे अभ्यासक,माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पारनेर येथे उद्या (शनिवारी) प्रकाशन होणार आहे.
तालुक्यातील करंदी येथील मुळचे रहिवासी असलेल्या साहेबराव ठाणगे यांनी प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षण घेतले. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सरव्यवस्थापक पदावर पोहचले. जबाबदारीच्या पदावरील नोकरी, समर्थपणे सांभाळत असतांना त्यांनी साहित्यसेवा करून कसदार साहित्य निर्मितीही केली. आत्तापर्यंत त्यांचे पाच कवितासंग्रह, चार ललित लेख संग्रह, एक व्यक्तिचित्र संग्रह आणि एक चरीत्र, अशी एकूण अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांना, शांता शेळके पुरस्कार, गदिमा साहित्य पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
उद्या, शनिवार दि.२६ फेब्रुवारी, रोजी, पारनेर दत्तराज सभागृह, गुरुवाडा येथे दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या समारंभात, उल्हासदादा पवार यांच्या हस्ते साहेबराव ठाणगे यांच्या ‘ पांढरे कावळे ‘ या कवितासंग्रहाचा आणि ‘ सोयरे सकळ ‘ या व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी आमदार निलेश लंके, मसापचे मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे.सतीश सोळांकुरकर नगराध्यक्ष विजय औटी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.आर.जी.सय्यद उपस्थित राहणार आहेत.
श्री. ठाणगे यांनी मसापच्या पारनेर शाखेचे अध्यक्ष दिनेश औटी यांच्या सहकार्याने तसेच मातोश्री प्रतिष्ठाणच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात साहित्याची मशागत केल्याने तालुक्यात अनेक हात लिहिते झाले आहेत. या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन दिनेश औटी आणि संजय पठाडे, कारभारी बाबर,प्रकाशक नितीन हिरवे यांनी केले आहे.


from https://ift.tt/Q984fIJ

0 Comments:

Responsive

Ads

Here