मेष : नवीन लोक संपर्कात येतील. अतिविचार करू नये. जिभेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल.
वृषभ : कमिशनमधून लाभ मिळेल. अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील. उघडपणे बोलणे टाळाल.
मिथुन : नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे. कामाचा आनंद मिळेल. जामीन राहताना पूर्ण विचार करावा.
कर्क : छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.
सिंह : जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. घरगुती कामे मनापासून कराल.
कन्या : आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा.
तूळ : आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल. आपले प्रभुत्व गाजवाल.
वृश्चिक : मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे. गप्पा गोष्टींची मैफल जमवाल.
धनू : अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा.
मकर : सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल.
कुंभ : वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल.
मीन : लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल.
from https://ift.tt/lLzjWZD
0 Comments: