INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

 

▪मेष : दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील.
▪वृषभ : कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल.
▪मिथुन : क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे.
▪कर्क : मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल.
▪सिंह : घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
▪कन्या : तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये.
▪तूळ : कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल.
▪वृश्चिक : योगायोगाची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा.
▪धनू : व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांती जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
▪मकर : वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी.
▪कुंभ : वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका.
▪मीन : मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.


from https://ift.tt/eFjJITo

0 Comments:

Responsive

Ads

Here