INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

…म्हणून रेल्वे गाड्यांच्या छतावर गोल आकाराचे झाकण असते! जाणून घ्या,मनोरंजक पण शास्त्रीय माहिती.

…म्हणून रेल्वे गाड्यांच्या छतावर गोल आकाराचे झाकण असते! जाणून घ्या,मनोरंजक पण शास्त्रीय माहिती.

 

भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. अशाच एका गोष्टीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रेल्वे गाड्यांच्या छतावर गोल आकाराचे झाकण का लावलेले असते? चला, तर जाणून घेऊयात.. 
$ads={1}
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या डब्यांच्या छतावर बसवलेल्या प्लेट्स किंवा गोलाकार आकारांना रूफ व्हेंटिलेटर असे म्हणतात.
ट्रेनच्या डब्यात प्रवाशांची संख्या जास्त असली की, उष्णता वाढते. ही उष्णता अथवा सफोकेशन बाहेर पडणे गरजेचे असते. त्यासाठी रेल्वेच्या डब्यात ही विशेष व्यवस्था असते. अन्यथा रेल्वेच्या डब्ब्यात राहणे खूप कठीण होऊ शकते.
$ads={2}
रेल्वेच्या डब्यामध्ये एक जाळी असते. ज्यामुळे डब्ब्यातील गॅस बाहेर जाण्यास मदत होते. म्हणजेच, कोचवर कुठेतरी जाळी असते आणि छिद्र असते. ज्यातून हवा बाहेर जाते. तसेच जाळीवर आणखी एक प्लेट लावली जाते, जेणेकरून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी रेल्वेच्या आत येऊ नये.

0 Comments:

Responsive

Ads

Here