INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

चुकून बटण दाबलं आणि 37 लाखांची लॉटरी लागली…! असा घडला सगळा प्रकार.. वाचाच !

चुकून बटण दाबलं आणि 37 लाखांची लॉटरी लागली…! असा घडला सगळा प्रकार.. वाचाच !

 


आपण श्रीमंत व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. रातोरात श्रीमंत होणारी एक घटना आता समोर आलीय. त्याचं झालं असं की, लॉटरी वेंडिंग मशिन वापरताना एका महिलेचं चुकून भलतंच बटण दाबलं आणि त्यानंतर तिचं नशीब फळफळलं आहे. तिला चक्क 37 लाखांची लॉटरी लागली आहे. 
$ads={1}
‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना मेरीलँडमध्ये राहणाऱ्या एका 43 वर्षीय महिलेसोबत घडलीय. सदर महिला हॅगरस्टाउनमधल्या हाफवे लिकर्समध्ये लॉटरी वेंडिंग मशीनजवळ उभी होती. यादरम्यान महिलेच्या हातून चुकून लॉटरी मशीनचं बटण दाबलं गेलं. हे बटण दाबताच मशीनमधून 20 डॉलर स्क्रॅच-ऑफ गेमऐवजी 5 डॉलरचं डिलक्स क्रॉसवर्ड म्हणजे 50 हजार डॉलर्स लॉटरीचं तिकीट बाहेर आलं.
$ads={2}
हे पाहून महिलेला काही कळेना. आपल्याला हवं असलेलं तिकीट न आल्याने ती नाराज झाली. क्रॉसवर्ड गेम आवडत नसल्याने महिला ते तिकीट घेऊन घरी आली. यानंतर मेरीलँड लॉटरी स्मार्टफोन अ‍ॅपवरून तिने तिकीट स्कॅन केलं. हे करताच महिलेला अभिनंदनाचा आणि 50,000 डॉलर जिंकल्याचा मेसेज आला. यानंतर तिला आश्‍चर्याचा धक्काच बसला.

आपल्याला एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे, हे तिला खरं वाटत नव्हतं. मग तिने लॉटरी तिकीट कार्यालय गाठलं. पुन्हा लॉटरी तिकीट स्कॅन केलं. तेव्हा आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, याची तिला खात्री पटली.

0 Comments:

Responsive

Ads

Here