आम्ही अभिमन्यूला अर्जुनाचा पुत्र समजलो तर ते केवळ एक कथानक ठरेल.आमच्या मुलात आम्ही अभिमन्यू पाहिला तर तो चक्रव्यूहात अडकणार नाही याची तजबीज वेळीच करता येईल.
सज्जनहो मुलं पुस्तकी किडा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
त्याला लोकव्यवहारज्ञान देणे,सत असत ज्ञान देणे, ही आईवडिलांची जबाबदारी आहे. त्याला समाजात कसं वागावं हे कळणं म्हणजे चक्रव्यूहात प्रवेशुन यशस्वीपणे बाहेर येणे आहे. हे जमले नाही तर लोक काय म्हणतील?या व्यर्थ विचाराने तो संसार चक्रव्यूहात फसणार आहे.
$ads={2}
अभिमन्यु चक्रव्यूहात फसला तेव्हा वडिलच काय पण प्रत्यक्ष युद्धभुमीवर भगवंत उपस्थित असताना ते सुद्धा त्याला वाचवु शकले नाही.त्याही अगोदर हे लक्षात घ्या की अभिमन्युला चक्रव्युहातुन बाहेर येण्याचे ज्ञान नाही हे स्वतः भगवान श्रीकृष्ण जाणत होते.आपणही आपल्या मुलांचे एखाद्या विषयातले कमीपण जाणत असतो.ते दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचं भविष्य घडवताना आपल्या हट्टापायी त्याचा अभिमन्यु होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायलाच हवी.त्याच्या भविष्याची सुरुवात गर्भधान संस्काराने होते हे समजले तरी खूप काही चांगले घडेल.
0 Comments: