INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

…म्हणून कानात जमा होणारा मळ काढणे चुकीचे आहे ! जाणून घ्या,सविस्तर माहिती.

…म्हणून कानात जमा होणारा मळ काढणे चुकीचे आहे ! जाणून घ्या,सविस्तर माहिती.

 


कालांतराने आपल्या कानात मळ जमा होणे सामान्य बाब आहे. वास्तविकतः आपल्या कानांच्या संरक्षणासाठी मळ (मेण) असतो. त्यामुळे बाहेरील धुळीचे कण कानात जात नाहीत आणि बॅक्टेरियांची वाढ होत नाही. आज याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
$ads={1}
▪️ जर कान दुखत असेल, ऐकू कमी येत असेल, तरच तुमच्या कानाची सफाई आवश्यक आहे. पण जेव्हा गरज असेल तेव्हाच कान स्वच्छ करा. सातत्याने मळ काढल्यास समस्या उद्भवू शकते
▪️ तज्ज्ञांच्या मतानूसार, कान स्वच्छ करण्यासाठी कापसाच्या गाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करू नका. अशाने तुमच्या कानाचा पडदा खराब होऊ शकतो. तसेच ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
$ads={2}
▪️ अति प्रमाणात कान स्वच्छ केले तर अनेक वेळा मेण कानाच्या आतमध्ये जाऊन समस्या सुटण्याऐवजी वाढू शकते.
▪️ कॉटन बड किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा वारंवार वापर केल्याने संसर्गाचा धोका वाढतो, एवढं नक्की!
▪️ कानातील मेण जास्त प्रमाणात स्वच्छ केल्याने, बॅक्टेरिया आणि धूळ सहजपणे तुमच्या कानात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

▪️ घाणेरडे कान साफ ​​न करणे आणि अनावश्यक कान साफ ​ करणे, या दोन्हीमुळे संसर्गाचा धोका वाढतो.
▪️ कान स्वच्छ करण्यासाठी ईएनटी तज्ज्ञांची मदत घ्यावी. स्वतः स्वच्छ करू नका.
▪️ जर कानात मेण लवकर जमा होत असेल तर यासंदर्भात तज्ञांचा सल्ला घ्या.

0 Comments:

Responsive

Ads

Here