INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

संजय गांधी योजनेचा हजारो गरजूंना मदतीचा हात !

संजय गांधी योजनेचा हजारो गरजूंना मदतीचा हात !

पारनेर : शासनाच्या विविध लाभाच्या योजना सर्वसामान्य शेवटच्या घटकांपर्यंत कशा पोहोचवता येईल हा नेहमीच प्रयत्न असणारे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत सोमवारी पारनेर तहसील कार्यालय येथे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या उपस्थितीत तसेच संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष ठकाराम लंके यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली.
कोरोना काळात झालेली प्रशासकीय अनिश्चितता लक्षात घेता अनेक महिने संजय गांधी निराधार कमिटीची बैठक होऊ शकली नाही.परंतु 2 ऑगस्ट 2021 रोजी बैठक घेत कोरोनाच्या महामारीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळवून देत 102 प्रकरणी मंजूर करण्यात आले होते.
श्रावणबाळ वृद्धापकाळ व संजय गांधी योजनेच्या अनेक महिन्यापासूनची प्रकरणे शासकीय तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होते. सर्वसामान्य गरीब जनतेची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा म्हणून संपूर्ण कमिटीचे सदस्य व अध्यक्ष वारंवार बैठक लावण्याची मागणी करत होते .दोन महिन्यापूर्वी बैठक होणार हे जाहीर झाले असतानाही अचानक पारनेर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागली व ही बैठक होऊ शकली नाही .त्यामुळे अनेक महिने ही प्रकरणे प्रलंबित राहिली सोमवारी झालेल्या बैठकीत श्रावण बाळ योजने अंतर्गत 1163 प्राप्त अर्ज आले असून वृद्धापकाळ योजनेचे 32 संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा परित्यक्ता व इतर असे 174 व दिव्यांग 45 असे एकूण 1414 प्रकरणे प्रलंबित होते ते सर्व प्रकरणे आमदार निलेश लंके व कमिटीचे अध्यक्ष ठकाराम लंके यांनी अशासकीय सदस्य श्रीकांत चौरे , सचिन पठारे , संदीप रोहकले, सौ. शालिनी घुले,विकास साळवे या सदस्यांच्या मदतीने आमदार निलेश लंके हे संजय गांधी बैठकीसाठी स्वतः हा उपस्थित राहात एक सेवाभाव म्हणून कामे करा व खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून द्या असे मार्गदर्शनही यावेळी केले यावेळी आ. लंके यांनी केले.
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, विलास भांमरे या अधिकाऱ्यांसह संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष ठकाराम लंके व सर्व सदस्यांचा सत्कार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी अध्यक्ष सर्व सदस्य यांच्यासह अशोकराव घुले , अक्षय थोरात, अमोल पवार , मनोज शिंदे यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .

शासनाच्या विविध योजना सर्वसाधारण शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी सोमवारी झालेल्या संजय गांधी कमिटीच्या बैठकीस स्वतः उपस्थित राहत गोरगरीब जनता आज अडचणीत असताना सदर योजनेच्या माध्यमातून आजवर हजारो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊ शकलो . सदर कमिटीचे अध्यक्ष हा विद्यमान आमदार असतानाही संजय गांधी कमिटीवर शेवटचा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून ठकाराम लंके यांना अध्यक्ष करत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे व प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी नेमणूक केलेल्या अध्यक्ष व सदस्यांचाही यात मोठा सहभाग आहे सर्वांनी एक सेवाभाव समजून या कमिटीवर काम करावे व महाराष्ट्रात एक अनोखी अशी संजय गांधी कमिटी पारनेर तालुक्यात वेगळेपण सिद्ध करणार व येत्या काही दिवसात एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची मला खात्री आहे.
आमदार निलेश लंके


from https://ift.tt/P91lw4vxm

0 Comments:

Responsive

Ads

Here