सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून, सर्व विद्याशाखा आणि सर्व वर्षांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत.
$ads={1}
विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायचा की ऑनलाईन याबाबत गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. कोरोणाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याप्रमाणे तयारीही सुरू झाली होती. पण गेल्या आठवड्याभरात व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांनी पुन्हा एकदा ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सोमवारी हा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने प्रदीर्घ चर्चा करून अखेर परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षा ठरलेल्या कालावधीतच होतील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता काही विद्याशाखांची रखडलेली वेळापत्रक जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 Comments: