मेष : सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल.
वृषभ : प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.
मिथुन : करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल. मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल.
कर्क : सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल.
सिंह : भावंडांच्या समस्या समजून घ्याल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील.
कन्या : व्यावसायिक लाभ उत्तम होईल. पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल.
तूळ : कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल.
वृश्चिक : ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल.
धनू : भडकपणे मत मांडू नका. मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मकर : चार-चौघांत कौतुक केले जाईल. शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल. जबाबदारीने कामे उरकाल.
कुंभ : इतरांना आनंदाने मदत कराल. कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा.
मीन : आवडीचे पदार्थ खायला मिळतील. सतत काळजी करत बसू नये. रेस जुगारातून लाभ संभवतो. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये.
from https://ift.tt/XanRs1o
0 Comments: