INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुंग्यांबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती नसतील!

मुंग्यांबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती नसतील!

मुंग्या आजारी पडतात? त्या आजारी पडल्यावर बऱ्या कशा होतात? त्यांच्याकडे डॉक्टर असतो का? अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणारे संशोधन शास्त्रज्ञांच्या टीमने केले आहे. यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
▪ एका अहवालानुसार, मुंग्या अनेकदा बुरशीमुळे आजारी पडतात. जेव्हा मुंगी ब्युवेरिया बेसियाना नावाच्या बुरशीला स्पर्श करतात तेव्हा त्या आजारी पडतात आणि सुस्त देखील होतात.
▪ बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी मुंग्या स्वत:च विशेष प्रकारचे रसायन हायड्रोजन पेरोक्साईड शोधतात. हे रसायन दोन गोष्टींमध्ये (फुलांचा रस आणि दुसरा मध दव) मुग्यांना आढळते.
▪ मध दव हा एका विशिष्ट प्रकारच्या कीटकापासून येतो. जो वनस्पतीच्या जवळ आढळतो. याच गोष्टी मुंग्यांना बरं व्हायला मदत करतात. म्हणून जेव्हा मुंग्या आजारी पडतात, तेव्हा त्या स्वत:चं अन्न शोधतात.
▪ मुंग्या संसर्गावर मात करण्यासाठी फुलांचा रस पिणे पसंत करतात, कारण त्यात हायड्रोजन पेरॉक्साईड जास्त असते. जे त्यांना बरं होण्यात मदत करते.


from https://ift.tt/jdEJLhi

0 Comments:

Responsive

Ads

Here