INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सारोळा अडवाईत उद्यापासून होणार ७ कोटी ‘रामकृष्ण हरि मंत्रा’चा जप !

सारोळा अडवाईत उद्यापासून होणार ७ कोटी ‘रामकृष्ण हरि मंत्रा’चा जप !

पारनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सारोळा अडवाई येथील वैकुंठवासी ब्रम्हनिष्ठ सद्गुरू खोदडेबाबा यांच्या सत्ताविसाव्या पुण्यास्मरणानिमित्त उद्या ,गुरूवार दि. ३मार्च पासून ‘रामकृष्ण हरि’ या महामंत्राचा सात कोटी नामजपसप्ताह व भागवत कथेस प्रारंभ होणार आहे. अशा प्रकारच्या महामंत्राचा जप असणारा हा जिल्हयातील एकमेव सोहळा आहे. या कार्यक्रमाची सुरूवात पद्मश्री पोपटराव पवार, आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून होणार आहे.

कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे या सप्ताहाची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून खंडीत झाली होती. मात्र सध्या हे संकट निवाळले गेल्याने या सप्ताहाच्या आयोजनाच्या नियोजन खोडदेबाबा सेवा मंडळाने केले आहे. सप्ताहाचा प्रारंभ उदया दि. ३ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
ह.भ.प ज्ञानेश्‍वर महाराज कदम, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड, ह.भ.प ज्ञानेश्‍वर महाराज कदम, ह.भ.प पुंडलीक महाराज जंगले शास्त्री, ह.भ.प डॉ.नारायण महाराज जाधव यांची सप्ताह काळात किर्तन सेवा होणार असून मंगळवार दि.८ मार्च रोजी अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

या सप्ताहकाळात काकडा भजन, अभिषेक, महापुजा, रामकृष्ण हरि जप, भागवत कथा, हरीपाठ, हरिकिर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सारोळा अडवाई, चास, भोयरेपठार, ढवळपूरी, टाकळीखातगांव, दैठणेगुंजाळ, भांडगांव, जामगांव, वडगांव आमली, लोणीहवेली, हिवरे कोरडा, नेप्ती,गोरेगांव, भनगडेवाडी, ढोकी, म्हस्केवाडी, राळेगणसिध्दी, घोसपुरी, हिवरेझरे, येथील भजनी मंडळांचा दैनंदिन जागर होणार आहे. या सप्ताहाचे व्यासपीठ चालक शिवाजीबाबा लामखडे व पंढरीनाथ महाराज माने हे असून साहेबराव महाराज जाधव हे भागवत कथा सांगणार आहेत. या सप्ताहास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वै. खोडदे बाबा सेवा मंडळ समस्थ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


from https://ift.tt/qcoxKBE

0 Comments:

Responsive

Ads

Here