उन्हाळ्यात शरीराला आणि त्वचेला थंडावा मिळण्यासाठी पुदिन्याचा उपयोग चहासाठी देखील केला जातो. कारण पुदिन्याचा चहा आरोग्यास लाभदायी आहे. पुदिन्यामध्ये मेन्थाॅल, प्रथिनं, फायबर, कर्बोदकं, अ जीवनसत्व, रिबोफ्लेविन, तांबं, लोह यासारखे पोषक घटक आहेत.
पुदिन्याचा चहा कसा करतात? : प्रथम 8-10 पुदिन्याची पानं, अर्धा छोटा चमचा मिरेपूड, अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ आणि 2 कप पाणी घ्या. भांड्यात पाणी घेऊन ते मंद आचेवर उकळत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पुदिन्याची पानं, मिरेपूड आणि सैंधव मीठ घालून पाणी पुन्हा 5 मिनिटं उकळा. नंतर चहा गाळून तो प्या.
पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे…
1. पचन क्रिया सुरळीत होते, पचनाशी निगडित समस्या दूर होतात.
2. डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास दूर होतो.
3. या चहातील घटक वेदना कमी करण्यास फायदेशीर असतात.
4. मासिक पाळीत पोटात, कमरेत होणाऱ्या वेदना पुदिन्याचा चहा पिल्यानं कमी होतात.
5. शरीर आणि मनावरचा ताण कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते. निद्रानाशाच्या समस्येत पुदिन्याचा चहा फायदेशीर ठरतो.
6. केसांचा पोत चांगला होतो. पुदिन्याच्या चहामुळे केस मजबूत होतात. केस गळण्याची समस्या दूर होवून केस दाट होतात.
7. वजन नियंत्रित राहातं. वजन कमी करायचं असल्यास पुदिन्याचा चहा प्यावा. तसेच पुदिन्याच्या चहानं रक्तातील साखर नियंत्रित राहाते.
8. या चहातून शरीराला मेन्थाॅल मिळतं. त्यामुळे त्वचेस थंडावा मिळतो. ॲलर्जीची समस्या दूर होते.
टीप : वरील लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.
from https://ift.tt/XEN1z4L
0 Comments: