INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

1 एप्रिलपासून कोणते नियम बदलणार?

1 एप्रिलपासून कोणते नियम बदलणार?

येत्या 1 एप्रिलपासून अनेक बदल होणार असून याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. पोस्ट ऑफिसपासून ते बँकिंग गुंतवणुकीपर्यंत अनेक नियमांचा यात समावेश आहे. त्यावर एक नजर टाकूयात…
1. पोस्ट ऑफिस : लवकरच पोस्ट ऑफिसच्या काही योजनांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यानुसार, आता ग्राहकांना टाईम डिपॉजिट खातं, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते किंवा बँक खाते उघडावे लागणार आहे. लहान बचतीत जमा केलेल्या रकमेवर पूर्वी जे व्याज मिळत होते ते आता फक्त पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किंवा बँक खात्यात जमा केले जाणार आहे. आता पोस्ट ऑफिसचे छोटे बचत खाते बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खात्याशी जोडणे अनिवार्य असणार आहे.
2. अ‍ॅक्सिस आणि पीएनबी बँक : अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यासाठी मासिक मर्यादा आता 12 हजार रुपये केली आहे. पीएनबीने बँकेने 4 एप्रिलपासून पॉझिटीव्ह पे प्रणाली लागू करणार आहे. याअंतर्गत, पडताळणीशिवाय चेक पेमेंट शक्य होणार नाही. हा नियम 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी अनिवार्य आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली. अनेक बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता काही बँका ही योजना बंद करण्याची शक्यता आहे.
3. पीएफ आणि जीएसटी : 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. त्यानुसार पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर आकारला जाईल. नियमांनुसार, ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. मात्र त्याच्यावर योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्यासाठी उलाढाल मर्यादा 20 कोटी रुपये केली आहे. हा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू केला जात आहे.
4. क्रिप्टो करन्सी : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार येत्या 1 एप्रिलपासून सरकार व्हर्च्युअल डिजिटल अ‍ॅसेट (VDA) किंवा क्रिप्टोवरही 30 टक्के कर आकारणार आहे. तसेच क्रिप्टो मालमत्ता विकली जाईल, तेव्हा त्याच्या विक्रीतून 1% टीडीएस देखील कापला जाणार आहे.


from https://ift.tt/vs9fHV5

0 Comments:

Responsive

Ads

Here