पारनेर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे खंडित झालेला तालुक्यातील सारोळा अडवाई येथील वै. ब्रह्मनिष्ठ सद्गुरु खोडदे बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नामजप सप्ताह व भागवत कथेचा कार्यक्रम करण्याचा निर्णय शिष्य संप्रदाय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सप्ताहाचे हे २७ वे वर्ष आहे.
तालुक्यातील सारोळा अडवाई येथील खोडदे बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी राम कृष्ण हरी या महामंत्राचा ७ कोटी नामजप सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहासाठी पारनेर, नगर तालुक्यात बरोबरच मुंबई विशेषता: कुलाबा येथील हजारो भाविक हजेरी लावत असतात मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष भाविकांशिवाय साधेपणाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याने शासनाच्या नियमांचे पालन करुन या वर्षी नामजप सप्ताह करण्याचा निर्णय शिष्य संप्रदाय मंडळाने नियोजन बैठकीत घेतला आहे. राम कृष्ण हरी या महामंत्राचा सात कोटी नामजप होणारा हा राज्यातील एकमेव सप्ताह आहे.
यावर्षी सप्ताह साजरा होणार असल्याने भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराच्या भव्य सभामंडप व कलशाचे कामही पूर्ण झाले आहे. गुरुवार दि. 3 मार्चपासून ते मंगळवार दिनांक 8 मार्च पर्यंत हा नामजप सप्ताह साजरा होणार आहे. काकडा भजन, राम कृष्ण हरी जप, भागवत कथा, हरिपाठ, हरी किर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन शिष्य संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ह.भ.प. भागवताचार्य साहेबराव महाराज जाधव,ह.भ.प. योगेश महाराज शिंदे,बाळासाहेब आंबेकर ,प्रकाशशेठ म्हस्के,विनोदशेठ दंडवते,सरपंच परशुराम फंड,अनिल महांडुळे,भाऊसाहेब ठाणगे,भाऊसाहेब चेमटे,बाबाजी बांगर,बापुसाहेब गुंजाळ,सोपान वाळुंज, डॉ.दत्तात्रय महांडूळे,बाबासाहेब खोडदे,प्रताप खोडदे तसेच सारोळा अडवाई,भोयरे पठार,जामगाव,तिखोल,दहिगाव साकत येथील ग्रामस्थ नियोजनाच्या बैठकीला उपस्थित होते.
from https://ift.tt/bydJ6cK
0 Comments: