INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खुशखबर ! आता येणार ‘टाटा’ची इलेक्ट्रीक कार !

खुशखबर ! आता येणार ‘टाटा’ची इलेक्ट्रीक कार !

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना परवडणारी टाटा मोटर्सची सर्वात छोटी कार टाटा नॅनो हे कंपनीचे मानद चेअरमन रतन टाटांचे स्वप्न होते. ही कार रस्त्यावर आली परंतू काही वर्षांतच ती बंदही झाली. लोकांनी या कारला फारसा प्रतिसाद दिला नाही. गेल्या दोन वर्षांपासून टाटा नॅनोच्या केवळ एक दोनच कार बनल्या आहेत. असे असले तरी टाटा उमेद हरलेले नाहीत. रतन टाटांच्या कंपनीने ही कार इलेक्ट्रीकमध्ये तयार केली आहे. या कारमधून सफर करण्याचा मोह रतन टाटांनाही आवरला नाही. 
टाटा नॅनो ईव्ही रतन टाटांना देण्यात आली. तेव्हा टाटा यांनी त्यामधून प्रवास केला. इलेक्ट्रीक व्हेईकल्ससाठी पावरट्रेन बनविणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्ही (Electra EV) या टाटा नॅनोला कस्टमाईज केले आहे. टाटा नॅनोला ईव्ही कारचे रुप दिले आहे. Electra EV ने याची माहिती LinkedIn वर दिली. रतन टाटांना ही कार केवळ आवडलीच नाही, तर त्यांनी या कारमधून सफरही केली. रतन टाटांना 72V Nano EV देण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेला फिडबॅक हा सुपर प्राऊड आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
▪Tata Nano EV ची वैशिष्ट्ये
नॅनो ईव्ही ही 4 सीटर कार आहे. ही कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते 60 किमी प्रतितास वेग वाढवते. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, यामुळे कारचा खरा अनुभव येतो. ग्राहकांना इको-फ्रेंडली व खासगी वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नाही.
▪213 किमीची रेंजया कस्टम
बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये 72V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित 213 किमीची रेंज गाठली. असे करताना कंपनीने पॉवरट्रेनमध्ये कोणतेही भौतिक बदल केले नाहीत.


from https://ift.tt/JE2ocB5

0 Comments:

Responsive

Ads

Here