INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी दोन्हींमधील फरक माहिती आहे का?

व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी दोन्हींमधील फरक माहिती आहे का?

तुम्ही अनेकदा व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी हे शब्द ऐकले असतील. कार्यक्रम किंवा मोठ-मोठ्या मंदिरांमध्ये व्हीआयपी एन्ट्री, व्हीआयपी सीट देखील असतात. मात्र हे लोक कोण असतात? व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण नक्की कसे कळणार? चला, तर जाणून घेऊयात या दोन्हींमधील फरक काय आहे तो…
व्हीआयपी म्हणजे नक्की काय? :
▪ व्हीआयपी म्हणजे व्हेरी इंम्पॉर्टंट पर्सन (Very Important Person).
▪ ज्यांना चांगल्या सोई सुविधा प्रदान केल्या जातात तसेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते. त्या व्यक्तींसाठी हा शॉर्ट फॉर्म वापरला जातो.
▪ जर मंत्रालयाला वाटले तर ते कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपीचा दर्जा देऊ शकते.
▪ या व्यक्तींसाठी व्हीआयपी गेट किंवा वेगळ्या दरवाज्याची व्यवस्था असते. तिथे ते खासगी गाडीने देखील पोहोचू शकतात.
▪ यामध्ये अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, खेळाडू येतात.
व्हीव्हीआयपी म्हणजे नक्की काय? :
▪ व्हीव्हीआयपी म्हणजे व्हेरी व्हेरी इंम्पॉर्टंट पर्सन (Very Very Important Person) होय.
▪ जे लोक व्हीआयपीपेक्षाही उच्च दर्जाचे असतात त्यांना ही सेवा दिली जाते.
▪ या लोकांची सुरक्षा कडक असते. त्यांना अंगरक्षकही दिले जातात.
▪ या व्यक्तींना एसपीजी, झेड आदी दर्जाची सुरक्षा असते.

▪ यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभांचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आदी येतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील येतात.


from https://ift.tt/Vlh9AQa

0 Comments:

Responsive

Ads

Here