INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्मार्टफोन सतत हँग होतोय का?

स्मार्टफोन सतत हँग होतोय का?

अनेकदा फोनमध्ये भरपूर अ‍ॅप्स असल्याने तो सतत हँग होतो. जर तुम्हाला सुद्धा याचा त्रास होत असेल तर काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा फोन पूर्ववत करू शकता. त्यासाठी खालील गोष्टी तुमची मदत करतील…
▪ डीप क्लीनिंग : तुमच्या स्मार्टफोनची डीप क्लिनिंग करा. यामुळे फोन हँग होण्याची समस्या नष्ट होईल. डीप क्लीन करणे म्हणजे फोनमधील अशा फाईल्स डिलीट करणे ज्याची गरज नाही. यामुळे तुमच्या फोनमधील मेमरी रिकामी होईल, प्रोसेसरवर दबाव पडणार नाही.
▪ फाईल्स डिलीट करा : तुमच्या स्मार्टफोनमधून डुप्लिकेट फाईल्स डिलीट करणे अत्यंत आवश्यक आहे. हे ते फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे आहेत जी तुमच्या स्मार्टफोनवर एकापेक्षा जास्त वेळा डाउनलोड झालेली असतात. या डुप्लिकेट फाईल्स डिलीट केल्यास तुमचा स्मार्टफोन हँग होणार नाही.
▪ कॅशे : तुमच्या स्मार्टफोनमधील कॅशे क्लीअर करा. यासाठी तुम्ही क्लिनर अ‍ॅप्सचा देखील अवलंब करू शकता. कॅशे (Cache) अशा फाईल्स असतात, सहसा त्याची फारशी गरज नसते.
वरील सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन पुन्हा-पुन्हा हँग होणार नाही, एवढं नक्की!


from https://ift.tt/Ec8jrae

0 Comments:

Responsive

Ads

Here