अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना बिस्किट आवडतात. हल्ली तर बिस्किटमध्ये डिझाईन ते फ्लेवर सगळंच वेगळं असतं. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? बिस्किटात छिद्र का असतात? नसेल तर आज त्याचे उत्तर जाणून घेऊयात…
अनेकांना असं वाटतं की, छिद्र हे त्याच्या डिझाईनकरता असेल. मात्र हे छिद्र खास कारणाकरता असते. या छिद्राला डॉकर्स म्हटले जाते. बिस्किट बनवताना त्यामध्ये हवा पास व्हावी याकरता बिस्किटामध्ये छिद्र असतात. यामुळे बिस्किट फुगत नाही. छिद्र असण्यामागे हे प्रमुख कारण आहे.
यामागे वैज्ञानिक कारण काय आहे? तर बिस्किटे बनवण्याआधी मैदा, साखर आणि मीठ एका पत्र्यासारख्या ट्रेवर पसरवून मशीनखाली ठेवले जाते. यानंतर हे यंत्र त्यांना छिद्र पाडते. या छिद्रांशिवाय बिस्किट नीट बनवता येत नाही. कारण बिस्किटे बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, त्यात थोडी हवा भरली जाते, जी ओव्हनमध्ये गरम करताना फुगते. त्यामुळे बिस्किटाचा आकार जसजसा मोठा होत जातो तसतशी डिश विस्कटायला लागते.
from https://ift.tt/kE2AaSZ
0 Comments: