पारनेर : भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि थळ सेनेच्या स्थापनेला पूर्ण झालेली 75 वर्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 14 फेब्रुवारी रोजी अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत गावातील आजी माजी जवानांचा सन्मान करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काढले होते.त्यानुसार ग्रामपंचायत कडूस ता.पारनेर मध्ये गावातील आजी माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात झाली. यावेळी पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.गावातील आजी माजी सैनिकांचे ग्रामपंचायत मधील प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडविण्यात येतील आणि त्यांना योग्य तो सन्मान देण्यात येईल असे ग्रामसेविका आश्लेषा ताजने यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.यावेळी सरपंच मनोज मुंगसे, उपसरपंच छाया रावडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण नरवडे,माजी सैनिक बबनराव करंजुले, भगवान दिवटे, हरिश्चंद्र शिंदे , दादासाहेब शिंदे, जयवंत रावडे, बळवंत दिवटे, परशुराम नरवडे, बाजीराव ठुबे, सुदाम गायकवाड, ज्ञानदेव रावडे, नामदेव करंजूले, दादा लंके, छबुबाई मुंगसे, हरिभाऊ रावडे, उद्धव कुलकर्णी, महादेव रावडे, संजय रावडे, भाऊसाहेब रावडे, दिनकर शिंदे, विश्वनाथ मदने, राधाबाई दिवटे, संपत रावडे, शशिकांत दिवटे, प्रकाश दिवटे, दीपक शिंदे, संजय जाधव, बबन हिवरकर, सुरेश नरवडे, शहाजी गायकवाड, दत्तात्रय लंके, रोशन दिवटे, कुमार कणसे, सुदाम गायकवाड, बळवंत दिवटे, नामदेव करंजुले, ज्ञानदेव करंजुले, शब्बीर शेख, तलाठी पल्लवी गवळी, कृषी सहायक दिवटे, आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. अनेक माजी सैनिकांनी आपले अनुभव यावेळी सांगितले.
from https://ift.tt/E1gw3re
0 Comments: