INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिरूर तालुक्याच्या कन्या बनल्या सातारा जिल्ह्यात सभापती !

शिरूर तालुक्याच्या कन्या बनल्या सातारा जिल्ह्यात सभापती !

शिरूर : मलठण गावच्या कन्या सौ.संगीताताई राठोड – ओसवाल यांची कोरेगाव ( सातारा ) नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गेल्या महिन्यात बहूमताने निवड झाली होती आता त्यांची बांधकाम समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याने मलठणकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
येत्या 1 मार्चला महाशिवरात्र यात्रा महोत्सवात त्यांचा मलठण ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.संगीताताई या मलठणचे प्रख्यात व्यापारी स्व. हुकूमशेठ राठोड यांच्या कन्या आहेत. मुख्य बाजारपेठेत संगीताताई यांच्या वडिलांचा कपडे आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा खूप जुना व्यवसाय होता. त्यांच्या वडिलांनी अतिशय सचोटीने आणि मेहनतीने हा व्यवसाय संपूर्ण शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात नावारूपाला आणला होता.
मलठणच्या सामाजिक धार्मिक जडणघडणीत या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. लग्न झाल्यानंतरही संगीताताईंनी राजकारणाच्या माध्यमातून हीच परंपरा सासरी पुढे चालू ठेवली आहे. राठोड परिवारातील कन्येची कोरेगाव सातारा नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गेल्या महिन्यातच निवड झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या गळ्यात बांधकाम सभापती पदाची माळ पडली आहे. ही बातमी मलठणमध्ये समजताच मलठणच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला तर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी स्व.राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सातारा- कोरेगाव नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला 13 प्रभागांसाठी तर 18 जानेवारीला चार प्रभागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले होते. संपूर्ण सातारा जिल्ह्यात व्होल्टेज निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनलने तेरा जागांवर विजय मिळवत परिवर्तन करून एक हाती सत्ता मिळविली.
मलठणच्या कन्या सौ. संगीता राठोड – ओसवाल याच पॅनलमधून निवडणूक लढत होत्या. अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या वॉर्ड क्रमांक 13 मधून त्या 322 मतांनी विजयी झाल्या आहेत. संगीताताई ह्या उच्चशिक्षित असून मात्र राजकारणात नवख्या असूनही समोरच्या उमेदवाराला धूळ चारल्यामुळे त्या विशेष चर्चेत आल्या आहेत. त्यांचे पती नितीन ओसवाल यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली.


from https://ift.tt/LgXiNRn

0 Comments:

Responsive

Ads

Here