आपलं आयुष्य किती शिल्लक राहिलं आहे?असा प्रश्न सर्वांनाच पडतो.त्याची वेळ माहिती होणं चांगलं नाहीच.पण अगदी जवळ येऊन ठेपलेला काळ ओळखता येतो.
तुकोबाराय म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान।पण तो दिसतच नाही त्यामुळे सावधानता येणार तरी कुठुन?केसं काळी करून, डोळ्यांना चष्मा लावुध,श्रवणयंत्र वापरुन आम्ही शाबूत असल्याचं चित्र उभं करतो.पण खरंच हे समृद्ध जीवन आहे?तुमच्याकडे लक्ष्मी लोळण घेत असेल तर सुरकुतल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करुन तारुण्य टिकवल्याचा आनंद होईल. पण किती काळ?
मनुष्य हे अदभुत यंत्र आहे. अजुनही कितीतरी रहस्य शास्रज्ञ शोधु शकले नाहीत.संतांइतकं प्रगल्भ,ब्रम्हांडाला गवसणी घालणारं ज्ञान आम्हाला कुणालाही मिळवता येणार नाही. कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स इंन्स्टुमेंट उपलब्ध नसताना बाराव्या शतकात माऊलींनी नैष्कर्म सिध्दांत सांगताना भाष्य केलं,
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥९९॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो.
सुर्य चालत नाही हे बाराव्या शतकात माऊलींनी सांगितले त्यावेळी त्यांच्याकडे कोणती दुर्बीण होती?कोणती प्रयोग शाळा होती?ते आहे आत्मज्ञान. ज्यामुळे मृत्यू केव्हा येणार हे ही जाणता येते.माऊली म्हणतात,
कानी घालुनिया बोटे नाद जे पहावे।
न दिसता जाणावे नववे दिवशीं।।१
भोंवया पहाता न दिसे जाणा।
आयुष्यासी गणना सात दिवस।।२
डोळा घालुनिया बोट चक्र ते पहावे।
न दिसता जाणावे पांच दिवस।।३
नासाग्रीचे अग्र न दिसे नयनी।
तरी तेचि दिनी म्हणता रामकृष्णहरी।।४
ज्ञानदेव म्हणे ते साधुंचे लक्षण।
अंतकाळी आपण वेगी पहा।।५
हे पडताळुन पहाता येईल.पण विषाची परिक्षा नको.
आता तुम्ही लगेच भोवया,नाक,पहायला सुरुवात करु नका.मला इतकच म्हणायचं आहे की संतसाहित्याचे आपण अभ्यासक व्हा.जीवन सुंदर करण्याचा तो श्रेष्ठ मार्ग आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/Jhs5WKp
0 Comments: