पारनेर : तालुक्याबरोबरच नगर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या दैठणे गुंजाळ येथील ग्रामदैवत खंडेश्वर महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवाला उद्यापासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी माघ पौर्णिमेला या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.दुसऱ्या दिवशी कुस्त्याच्या आखाडा भरविण्यात येतो.कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने सर्व सामाजिक बंधने पाळून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
या निमित्ताने पहाटे मान्यवरांच्या हस्ते खंडेश्वराची महापूजा व अभिषेक होऊन उत्सवाला प्रारंभ होईल.त्यानंतर मानाच्या काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल.रात्री खंडोबाच्या गाण्याचा कार्यक्रम होईल.गुरूवारी(ता.२४) कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले असून यंदा नामवंत मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत. या वेळी ७५ हजार रूपयांची मानाची कुस्ती ऋषी लांडे व केवल भिंगारे यांची तर दुसरी ५१ हजार रूपये ईनामाची कुस्ती अप्पा कर्डीले व अक्षय पवार यांच्यात होणार आहे.या शिवाय अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच बंटी गुंजाळ यांनी दिली.
या उत्सवाला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साहेबा गुंजाळ,सुनील गुंजाळ,जयसिंग गुंजाळ,भाऊसाहेब येवले,दत्ता घोलप,डॉ.संतोष गुंजाळ,मोहन गुंजाळ,अशोक केदार,चेअरमन शिवाजी लावंड,उपरपंच,सचिन गुंजाळ,सुभेदार सुनिल गुंजाळ,देवस्थान समितीचेअध्यक्ष नामदेव गुंजाळ,पोपट जासूद,अशोक केदार,निलेश जासूद,गुलाब पाटील,भाऊसाहेब घोलप,लखन जाधव,सुभाष येवले सर,सबाजी येवले,संजय आंग्रे,विशाल नगरेआदींसह ग्रामस्थ व यात्रा समितीने केले आहे.
from https://ift.tt/Zt3arqP
0 Comments: