
तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की लहान मुले झोपेत का हसत असतात? याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे. चला, तर त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
● जेव्हा मुलाला आनंदी भावना जाणवते तेव्हा ते झोपेत हसते. याचा अर्थ लहान मुलांचे झोपेत हसणे त्यांच्या भावना विकसित होण्याचा एक भाग आहे.
● अनेकदा पोटाच्या समस्यांमुळे बाळांना चिडचिड होते आणि गॅस निघून गेल्यावर त्यांना आराम वाटतो. त्यामुळे लहान मुलं झोपेत हसण्याचे हे सुद्धा एक कारण आहे.
● झोपेच्या वेळी, बाळाला काही शारीरिक बदल जाणवू शकतात, ज्यामुळे त्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांना चालना मिळते आणि झोपेच्या वेळी बाळाला हसू येते.
● जर तुमच्या मुलांमध्ये वजन कमी होते, झोपण्यात अडचणी, सतत चिडचिड होणे किंवा विनाकारण हसणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा.
वेगवेगळ्या मुलांचे विकासाचे टप्पे वेगवेगळे असतात हे पालकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे मुलं एखादी गोष्ट उशिरा समजून घेत असेल तर त्यात काळजीची गरज नाही.
from https://ift.tt/1ZsiaFf
0 Comments: