पारनेर : पारनेर शहर रहिवाशी शिक्षकांच्या वतीने पारनेर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री.विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने नव्याने मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळालेले श्रीम. मंदाकिनी कावरे, श्री. भाऊसाहेब साठे, श्री. अशोक खामकर तसेच शिक्षक नेते संभाजी औटी यांचे चिरंजीव आशुतोष औटी यांची मल्टीनॅशनल कंपनीत सॉप्टवेअर इंजिनियर म्हणून नेमणूक झाल्याबद्दलही या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी हे होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष विजूभाऊ औटी म्हणाले की, शिक्षकांच्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचलो आहे. शहरात राहणाऱ्या कोणत्याही शिक्षकाने कोणतेही काम सांगावे. ते मी १००टक्के करुन दाखवील. शिक्षकांनी सातत्याने कार्यालयात येत रहावे त्यांचा सन्मान केला जाईल. यावेळी बोलताना अर्जुनशेठ भालेकर म्हणाले की, प्रभाग क्र. १० मधील शिक्षकांनीच आपला विजय सोपा केला. या प्रभागातील लोकांनी मला खूप प्रेम दिले. प्रभागातील ड्रेनेज, क्राँकीटीकरण, रस्ते, स्ट्रीट लाईट ही कामे त्वरीत पूर्ण केली जातील. असे आश्वासन श्री. भालेकर यांनी दिले.
प्रास्ताविक पारनेर तालुका प्रा. शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी औटी यांनी केले. यावेळी बोलताना श्री.औटी म्हणाले की पारनेर शहराचे शहरीकरण वाढत आहे. शहराचा विकास आराखडा, शाश्वत पाणी योजना , नाटयसंकूल, बगीचा, नाना नानी पार्क, चौक सुशोभीकरण, हॉस्पीटल, युवकांसाठी उद्योग व्यवसाय व बांधकांमांना व व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज मिळावे यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
यावेळी नामदेव शेरकर, शंभू दुधाडे, चंद्रकांत गट, सुनिल दुधाडे, श्रीम. शगूफा शेख, मीनल शेळके, मंदाकिनी कावरे, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विजय भास्कर औटी, शिवाजी काकडे,सचिन वाटमारे, अरूण रेपाळे, अशोक गाडगे, बाळासाहेब रोहकले, संदीप शिंदे, जयवंत पुजारी, हरीभाऊ जाधव, देवराम पिंपरकर, मल्हारी रेपाळे, अंबादास काकडे, कांतीलाल दिवेकर, अमोल दळवी, गोविंद रेपाळे, अशोक पानसरे, डी.एम.बांडे, अशोक थोरात, सुंदर सोबले, सरिता औटी, ज्योती साळवे, भारती कोरडे, संगिता दुधाडे, कमल साठे, कमल नरसाळे, प्रज्ञा साळवे, मनिषा गाडीलकर, वैशाली कदम आदी. उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या पानोली शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीम. कमल नरसाळे यांचाही मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. गौतम साळवे यांनी केले. शेवटी प्रा. शिक्षक समितीचे जिल्हा सहसचिव श्री. जयप्रकाश साठे यांनी आभार मानले.
प्रास्ताविकात बोलताना शिक्षक नेते संभाजी औटी यांनी सांगितले की पारनेर शहराच्या पाणी योजनेच्या प्रस्तावित प्रकल्पांसाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारवाडीयेथे आमच्या औटी परिवाराच्या वतीने लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल.
from https://ift.tt/cfNydFw
0 Comments: