INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्राणमय कोशावर विजय मिळवण्यासाठी काय करावे?

प्राणमय कोशावर विजय मिळवण्यासाठी काय करावे?

दीर्घ श्वास घेतला, की प्रत्येक मिनिटाला घेतल्या जाणाऱ्या श्वासाची संख्या कमी होते. प्राण्यांना हे श्वासाचं गणित अचूक सोडवता येतं. श्वास घेण्याची पद्धत आणि आयुमर्यादा याचा खूप जवळचा संबंध आहे.
उदाहरणार्थ,जाएंट टॉरटोइज नावाची कासवाची एक जात आहे. ही कासवं दर मिनिटाला फक्त तीन वेळा श्वास घेतात आणि त्यांची आयुमर्यादा ही १८० वर्षं इतकी असते. समुद्री कासव तीस मिनिटांपर्यंत श्वास रोखु शकतात.त्यांची आयुमर्यादा ४००वर्षांपर्यंत आहे. त्या अगदी उलट मिनिटाला तीस वेळा श्वास घेणाऱ्या माकडाची आयुमर्यादा ही केवळ वीस ते तीस वर्षं असते.मनुष्याचा श्वासदर प्रतिमिनिट बारा ते अठरा आहे. त्याहुन जास्त श्वास घेणाराची आयुमर्यादा कमी असणार.पण चिंता करु नका.नियमित सरावाने हा दर कमी करता येतो.आपण त्यासाठी प्राणमय कोशाचे चिंतन करणार आहोत.
प्राणमय कोश : प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पाच वायूंनी युक्त असलेल्या कोशाला प्राणमय कोश असे म्हणतात. हा कोश पाच कर्मेंद्रिये म्हणजे वाक्, पाणी पाद,पायु,आणि उपस्थ यांनीही युक्त असतो.पुढील भागात आपण अत्यंत हलक्या फुलक्या ओघवत्या भाषेतच हा अत्यंत कठीण असलेला कोश चिंतणार आहोत.
रामकृष्णहरी


from https://ift.tt/kPGdYh0

0 Comments:

Responsive

Ads

Here