नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे संसदरत्न पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.
फाऊंडेनशनने एकूण 11 खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे.
खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, फौजिया खान आणि हिना गावीत यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि रिवॉल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा या पुरस्कारावरं आपले नाव कोरले आहे. खा.सुप्रिया सुळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्विटकरुन अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील 4 खासदारांना पुरस्कार
प्राईम पॉईंट फाऊंडेशननं 2022 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील 11 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, फौजिया खान, हिना गावित यांना पुरस्कार देण्यात आलाय. प्राईम पॉईंटतर्फे देण्यात येणारा पुरस्कार हा खासगी संस्थेचा पुरस्कार आहे, सरकारचा नाही.
पार्थ पवारांनी केले आत्याचे अभिनंदन.
सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करुन अभिनंदन केले आहे. अभिनंदन आत्या, तुम्हाला पुन्हा एकदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात,असे पार्थ पवार म्हणाले आहेत.
from https://ift.tt/ox5G1yw
0 Comments: