कॉपी टाळण्यासाठी विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा व्यवस्था बळकट करणार - विद्यार्थ्यांवर राहणार 'वॉच'
कॉपी टाळण्यासाठी विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा व्यवस्था बळकट करणार
ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा गैरप्रकार घेऊन कॉपी करू पाहणारे विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वॉच ठेवला जाणार आहे.
यंदा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची स्क्रीनचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून यात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडकं कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे
$ads={1}
विद्यापीठाची यंदा चे सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या m.c.q. असणार आहेत
या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी काही प्रकार केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. आता त्यात आणखी काही कळत नियम लागू करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या स्क्रीनची रेकॉर्डिंग केली जाणार आहे
संबंधी विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ती स्क्रीन सोडून बाहेर असतील, तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
हे पण वाचा 👇
$ads={2}
आता गुगलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी…!
विद्यापीठाकडून ऑनलाईन परिक्षण बाबतीत अधिक सतर्क बाळगण्यात येणार असल्याने यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कसून तयारी करावीच लागणार आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आता परीक्षा विभागाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कशा प्रकारे प्रकार करू शकतात याबाबत सर्व माहिती विभागाकडे आहे. नेमका त्या गोष्टीवर लक्ष ठेवले जाणार असल्याने कॉपी करणाऱ्यांना यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
0 Comments: