एका रिपोर्टनुसार, कैसी आणि त्यांची पत्नी डेनिस एविल्स स्वत:चं घर खरेदी करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी आयुष्याची पुंजी लावली. दरम्यान या दाम्पत्याला एक ईमेल आला. ज्यात घराचं डील फायनल करण्यासाठी 8 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले होते. जोडप्याला या ई मेलमध्ये काहीही संशयास्पद वाटलं नाही. कारण हा मेल वकिलाच्या नावानं आला होता. सर्व गोष्टी व्यवस्थित वाटल्याने दाम्पत्याने व्यवहाराच्या वेळी स्वाक्षरी केली.
$ads={2}
मात्र जेव्हा या जोडप्याने वकिलांना फोन करुन सांगितले की, पैसे ट्रान्सफर केलेत. तेव्हा वकिलाचं उत्तर ऐकून जोडप्याची झोपच उडाली. वकिलाने सांगितले मी कुठलाही ईमेल पाठवला नाही. तेव्हा या जोडप्याला धक्का बसला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना या जोडप्याच्या अश्रूंचा बांध फुटला. बँकेने ही रक्कम लवकर परत मिळतील असा विश्वास दिला असून पोलीस याबाबत सध्या तपास करत आहेत.
0 Comments: